लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्यावरील चित्ररथ व गौरवयात्रा

सातारा दि. २० :    लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३९ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जीवनचरित्राची तसेच कार्याची विविधांगी माहितीचा  चित्ररथ व गौरव यात्रेला दौलतनगर ता. पाटण येथून सुरुवात करण्यात आली. या यात्रेला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी श्रीफळ वाढवून गौरव यात्रा मार्गस‌्थ केली.

या प्रसंगी रविराज देसाई, यशराज देसाई, अशोकराव पाटील, जयवंतराव शेलार, मिलींद पाटील, अभिजीत पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहात कार्यान्वित असणाऱ्या विविध संस्थांच्या वतीने लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी केलेल्या अतुलनीय कार्याचे व त्यांच्या जीवनचरित्रावरील काही महत्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे आणि गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून केलेल्या विविध विकास कामांचे, राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेले  चित्ररथ व गौरव यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. या चित्ररथाचे व गौरव यात्रेचा प्रारंभ  दौलतनगर येथील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळयापासून करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *