राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ

मुंबई, दि. १४  राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

सुधारित दरवाढ पुढीलप्रमाणे आहे. दुचाकी वाहन -५० (जुने दर ३५), पेट्रोल वरील तीनचाकी वाहन -१०० (जुने दर ७०), पेट्रोल सीएनजी एलपीजीवर चालणारे चारचाकी वाहन -१२५ (जुने दर ९०), डिझेलवर चालणारे वाहन-१५० (जुने दर ११०) हे दर तात्काळ अंमलात येत असून प्रत्येक वायूप्रदूषण तपासणीसाठी देय राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *