मुंबई, दि. २७ : कोविड १९ प्रादुर्भावामुळे आरोग्य व वैद्यकीय सेवा क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल व हेल्थकेअर विषयक आवश्यक कुशल मनुष्यबळ वाढवण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केली आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यात स्वारस्य असलेल्यांनी पुढील ठिकाणी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.
या योजनेत १८ ते ४५ वर्षे वयोगटातील युवा युवतींना जिल्ह्यातील प्रसिद्ध शासकीय व नामांकित खासगी रुग्णालयामध्ये आरोग्य क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमामध्ये विना शुल्क प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. त्या अंतर्गत आरोग्य क्षेत्रातील रोजगार सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रवेश घेण्याकरिता इच्छुक असलेल्यांनी तातडीने पुढील लिंकवर https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdThDxq5zza8OfEP2uaKW-Q3RwpDz9l7zIVHAoORzBuhV8Biw/viewform?usp=sf_link या ठिकाणी त्वरित आपली नोंदणी करावी. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील. अधिक माहितीकरिता दुरध्वनी क्र. ०२२-२२६२६३०३ यावर किंवा ईमेल mumbaicity.employment@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांच्यामार्फत करण्यात येत आहे.