नांदेड प्रतिनिधी, दि.०२ :- पंधरा दिवसाची चार धाम यात्रा यशस्वीरित्या पूर्ण करून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ४५ यात्रेकरूंचे शुक्रवारी रात्री नऊ वाजता नांदेड येथे आगमन होत असून यात्रेदरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यात्रेकरूंना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ऋषिकेश, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या धार्मिक स्थळांचे दर्शन पूर्ण झाले. बुधवारी रात्री हरिद्वार येथील हॉटेल विनायक मध्ये एक कार्यक्रम घेण्यात आला. संयोजक दिलीप ठाकूर यांनी विविध पुरस्काराची देण्यामागची भूमिका आपल्या प्रास्ताविकात विशद केली. सेवानिवृत्त नायब तहसीलदार नरसिंह ठाकूर व अखिल भारतीय क्षत्रिय महासभा महिला प्रदेशाध्यक्षा सुषमा ठाकूर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये उत्कृष्ट यात्रेकरू (पुरुष) श्रीकान्त झाडे व (महिला) सुशीलाताई बेटमोगरेकर यांची निवड करण्यात आली. याशिवाय विविध पदव्या देण्यात आल्या. त्यामध्ये गुणी अनिल जोशी, सज्जन त्र्यंबक लोंढे, ध्येयवादी अरविंद चौधरी ,चिकित्सक अशोक भोसले, कणखर सुरेश जाधव, स्पष्टवक्ती जयश्री चव्हाण, मिसेस कॉन्फिडन्ट संध्या पाटील, मिसेस फोटोजेनिक कविता चव्हाण, मिसेस टॅलेंटेड सरोज पाटील, मिसेस फॅशन आयकॉन सोनिया पाटील, मितभाषी राधाताई पाटील ,आदर्श कुसुम जांभळे, मनमिळावू शीला पवार, निर्मळ चित्रा चव्हाण, उत्साही मीरा चव्हाण, समाधानी वंदना चव्हाण, कृतिशील नंदिनी बेळगे व हेमलता शहाणे,संयमी सुंदर बोचकरी यांचा समावेश आहे. याशिवाय इंदू बेटमोगरेकर, नंदा कदम, जयश्री पाटील ,लक्ष्मी बस्वदे, विजयमाला चव्हाण, जयश्री झाडे, शीला खाकरे, मीना जोशी, श्रेयस गुर्जर ,सुनंदा लोंढे,अंजली चौधरी, कोंडाबाई भोसले, विजया जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
उत्कृष्ट व्यवस्था केल्याबद्दल अमोल गोळे व त्यांच्या टीमच्या सदस्यांना शाल व मोत्याची माळ देऊन प्रोत्साहित करण्यात आले. अतिशय खडतर असलेली चारधाम यात्रा उत्कृष्ट नियोजन, राहण्याची व प्रवासाची उत्तम व्यवस्था, घरगुती जेवण व वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे यशस्वी झाल्याबद्दल सर्व यात्रेकरूंनी दिलीप ठाकूर यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शुक्रवार ३ जून रोजी रात्री साडेनऊ वाजता नांदेड रेल्वे स्थानकावर यात्रेकरूंचे आगमन होणार असून स्वागतासाठी विविध सामाजिक संघटना व राजकीय पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती अमरनाथ यात्री संघाच्या वतीने देण्यात आली आहे.