मुखेड ता.प्रतिनिधी ज्ञानेश्वर कागणे मंगळवार १४ जून
मौजे झाडी अंबुलगा बुद्रुक येथे दिनांक २७ मे २०२२ रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आरोपीने आरोपी त्यांनी संमत करून फिर्यादीचे ट्रॅक्टरचे राहिलेले साडेतीन लाख रुपये देण्याच्या कारणावरून कुर्हाडीने रॉड डोक्यात मारून डोके फोडून गंभीर दुखापत करून खून करण्याचा प्रयत्न केला फिर्यादीचा भाऊ सोडविण्यासाठी आला असता त्यास पण काठीने मारून डोके फोडून जखमी केले. फिर्यादी संभाजी गोविंदराव झाडे वय २५ वर्ष व्यवसाय शेती, राहणार अंबुलगा बुद्रुक यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे मुक्रमाबाद येथे गुन्हा रजिस्टर नंबर १४४, २०२२ कलम ३०७, ३२४, ५०६, ३४ भादवी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कागणे हे करीत आहेत.