मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत उर्दू भाषेचे जतन, संवर्धन व प्रसार होण्याच्यादृष्टीने इमकान या त्रैमासिकाच्या “अफसानो मे मुंबई” या विशेषांकाचे प्रकाशन राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व उर्दू साहित्य अकादमीचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. अकादमीचे अधीक्षक नि कार्यकारी अधिकारी शोएब हाश्मी यावेळी उपस्थित होते.
या साहित्यिक विशेषांकात कृष्ण चंद्र, ओपिंदर नाथ अश्क, ख्वाजा अहमद अब्बास, कुदरतुल्ला शहाब, महेंद्र नाथ आणि साजिद रशीद यांच्यासह अनेक नामवंत ‘लेखकांच्या कथांचा समावेश आहे.