देगलुर प्रतिनिधी, दि.२० :- “देगलूर युवक राष्ट्रवादी काँग्रेस” पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर येथे केंद्र सरकार ने सुरु केलेल्या ‘अग्निपथ योजना’ रद्द करणे बाबत निवेदन देण्यात आले.
सविस्तर देगलूर, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकार अग्निपथ योजने अंतर्गत सैन्य भरती केल्या मुळे देशभरातून विरोध होत असून त्या विरोधात अनेक राज्यात तीव्र आंदोलन जाळपोळ झाले त्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला व सध्या देशभरात तीव्र आंदोलन होत आहे.
देशातील युवकांचा भावनेचा विचार करुन अग्निपथ योजने अंतर्गत ठेकेदारी पद्धतीने चालू केलेली सैन्य भरती प्रक्रिया रद्द करुन सैन्य भरती लाभार्थ्यांना सहकार्य करावे व देश हिताचा निर्णय घ्यावा. असे उपजिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन शांततेच्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या पुढे केंद्र सरकारने याचा विचार नाही केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी कडुन महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
या वेळी गजानन कांबळे, युवक जिल्हा सरचिटणीस
शंशाक पाटील मुजळगेकर, युवक तालुका अध्यक्ष शिवकुमार डाकोरे, विधानसभा अध्यक्ष सुमित कांबळे, युवक शहर अध्यक्ष
विकास नारबागे, सुजित सुर्यवंशी,ओमकार उल्लेवार,कृष्णा माळेगावकर, सुमंत कांबळे, मिलिंद कावळगावकर, योगेश मैलागिरे, विक्रम नागशेट्टीवार, मोईस भाई, शुभम इंगळे आदी उपस्थित होते.