नांदेड दि. २४:- शासन निर्णय १३ फेब्रुवारी २००८ अन्वये अनुसूचित जातीतील अनु. क्र. ११ या प्रवर्गातील गटई लाभार्थ्यांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल (१०० टक्के) अनुदानावर वाटप योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी (यापुर्वी लाभ देण्यात आलेले लाभार्थी वगळुन) आपले अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळे समोर, नांदेड या कार्यालयात ८ जुलै २०२२ पर्यंत अर्ज स्वत: स्वसाक्षाकींत करुन सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. अर्जदाराचा स्वत:चा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला. चालु आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला (तहसिलदाराने निर्गमित केलेला). अर्जदाराचे अथवा कुटूबांचे रेशनकार्ड (सांक्षाकित प्रत). गटई कामाचे प्रमाणपत्र / अस्वच्छ व्यवसाय प्रमाणपत्र (ग्रामसेवक / तहसिलदार / मुख्याधिकारी, नगर परिषद क्षेत्र) यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र. जागा नाहरकत प्रमाणपत्र (ग्रामसेवक / तहसिलदार / मुख्याधिकारी, नगर परिषद क्षेत्र) यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र. आधार कार्ड, मतदान कार्ड, वयाचा दाखला, (टी.सी),जागेचा दाखला (नमुना नं. ८), करारनामा (१०० च्या बॉडवर).