विधानसभा अध्यक्ष जेव्हा माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे आभार मानतात

 

मुंबई प्रतिनिधी, दि. ०४ :- जेव्हा काल विधानसभेत नव्या अध्यक्षाची निवड झाली आणि राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाली. या विशेष अधिवेशनाचे सर्व अपडेट माहिती व जनसंपर्क महासंचालनालय सातत्याने सर्व माध्यमांना देत होते. अध्यक्षांच्या अभिनंदनाचे सर्व अपडेट्सही महासंचालनायाने वेळोवेळी आपल्या सर्व समाज माध्यमाद्वारे जनतेपर्यंत पोहोचवले.

पडद्यामागे राहून शासनाची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या विभागाला आनंदाचे क्षण तसे कमीच अनुभवायला मिळतात, पण आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सर्व अधिकाऱ्यांनी आज केलेले काम उल्लेखनीय ठरले. खुद्द नव नियुक्त विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी ट्विट करून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला धन्यवाद दिले आहेत. Thank you @MahaDGIPR हे त्यांचे दोन शब्द आमच्या सर्व अधिकाऱ्यांचे मनोधैर्य वाढविणारे आहेत. खरच आज मनस्वी आनंद झाला. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे परिश्रम यात महत्त्वाचे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *