मुंबई प्रतिनिधी, दि. ०५ :- दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपूर येथे गर्दी करतात. या भाविकांच्या सोयीसाठी दि. ९ जुलै, २०२२ रोजी पंढरपूरसाठी नांदेड, जालना व औरंगाबाद येथून विशेष रेल्वे सोडण्यात येणार असून जालना येथून सायं.७-०० वाजता ही रेल्वे जालना स्थानकातून धावणार आहे. भाविकांनी या विशेष रेल्वेचा लाभ घेण्याचे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री श्री दानवे यांनी यावेळी केले.