माहिती मिळाल्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्याचे आवाहन
नांदेड दि. ०५ :- कुमारी विद्या अनिल कांबळे वय वर्षे १७ हिला दिनांक १३ जून २०२२ रोजी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार तिच्या आजोबाने शिवजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. वय वर्षे ७० असलेले बालाजी कोडिंबा दुधमल यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनने तपासाला गती दिली आहे.
सदर कु. विद्या अनिल कांबळे हिचा रंग गोरा, बांधा मध्यम, उंची ५ फूट अंगात फिकट काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस व पायात निळ्या रंगाची चप्पल आहे. तिला मराठी व हिंदी भाषा बोलता येते. ही मुलगी कोणाला आढळल्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशन नांदेड येथे ०२४६२-२५६५२० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे पोलीस उपनिरीक्षक बी. बी. कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. अधिक माहितीसाठी ९९७००७३४२५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिवाजीनगर पोलीस स्टेशनने केले आहे.