मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. ४: – ब्रिटिशांविरोधात प्रतिसरकार स्थापन करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नंदनवन शासकीय निवासस्थानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

‘क्रांतिसिंह नाना पाटील प्रखर राष्ट्रभक्त होते. त्यांनी प्रतिसरकार संकल्पना राबवून ब्रिटिशांच्या राजवटीला हादरा दिला. त्यांचे विविध घटकांना सोबत घेऊन सुदृढ समाज उभारणीचे प्रयत्न आणि त्यांची राष्ट्रभक्ती कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *