प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने हर घर तिरंगा अंतर्गत रॅलीचे आयोजन

नांदेड  दि. ६ :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मोटार सायकल रॅलीच्या वेळी रस्ता सुरक्षेचे महत्व नागरिकांना कळावे म्हणून सुरक्षित वाहतुकीचे महत्व पटवुन देणारे स्लोगनचे बॅनर लावण्यात आले होते. या मोटार सायकल रॅलीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी हिरवा झेंडी दाखवुन रॅलीला मार्गस्थ केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांची उपस्थिती होती. या मोटार सायकल रॅलीचे मार्गक्रमण जिल्हाधिकारी कार्यालय पासून पोलीस अधिक्षक कार्यालय, वजिराबाद, शिवाजी नगर, आयटीआय, तरोडा नाका, फरांदे मोटार्स नांदेड येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

या मोटार सायकल रॅलीमध्ये जिल्हयातील मोटार वाहन वितरकामध्ये फरांदे मोटार्सचे कौस्तुफ फरांदे, राईडवेल मोटार्सचे कमल कोठारी, एमएफ मोटार्सचे अब्दुल वहिद, जिल्हयातील सर्व वाहन वितरक व त्यांचे कर्मचारी यांनी उर्स्फूतपणे सहभाग घेतला.

यावेळी कार्यालयातील कार्यकारी अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक रत्नकांत ढोबळे, अमोल अवाड, गणेश तपकिरे, सहा. मोटार वाहन निरीक्षक पंकज यादव, अडकलवार, डुब्बेवार, श्री. रहाणे, श्री. टिळेकर, श्री. राठोड, श्री. जावळे, श्री.कंतेवार, श्री. राजुरकर, श्री. पानकर, श्री. गायकवाड, श्री ठाकुर, श्री सोमदे, श्रीम.कलाले, तसेच लिपिक कर्मचारी श्री, गाजुलवाड, श्री. केंद्रे, श्री. कंधारकर, श्री. शिंदे, श्री. पवळे, श्री. देवदे, श्री. काकडे, श्री.कुंडगीर, श्री.सातपुते, श्री. बुरुकुले, व असंख्य नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *