नांदेड दि. १३ :- नांदेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात मुख्य रस्त्यावर १२ ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री पासून ते १५ ऑगस्ट २०२२ रोजीच्या मध्यरात्री पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वा वर्धापन दिनोत्सवानिमित्त सोमवार १५ ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रध्वजवंदनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात होणार आहे. त्याअनुषंगाने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात मुख्य रस्त्यावर १२ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री पर्यंत उपोषणे, धरणे, मोर्चा, रॅली, रस्ता रोको, आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हे आदेश निर्गमीत केले आहेत.