देगलूर प्रतिनिधी दि:-२१ :- येथील देगलूर महाविद्यालयात दिवंगत पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त दि २०रोजी सद्भावना दिवस निमित्ताने सद्भावना प्रतिज्ञा घेण्यात आली .
याप्रसंगी जात वंश धर्म प्रदेश किंवा भाषाविषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून संविधानिक मार्गाने सोडवीन अशी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार डॉ. संजय पाटील डॉ.सर्जेराव रणखांब प्रा. डॉ. दुडूकनाळे तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. डॉ शेरीकर प्रा.उत्तम कुमार कांबळे , प्रा.वाकडे प्रा.वावधाने प्रा.सौ.देबडवार ,सौ तोंडारे आदी सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.