राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी शंकर सिंह ठाकुर तर नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी मारोती शिकारे यांची निवड.

नांदेड:-( प्रतिनिधी ) दि.२३:-  राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यांच्या वतीने राज्य चिंतन मेळावा नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास अध्यक्ष मा. श्री विजयजी सूर्यवंशी (संस्थापक अध्यक्ष), प्रमुख पाहुणे मा.सचिन पाटील (पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण), मा. प्रताप दिघावकर (सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक तथा सदस्य लोकसेवा आयोग महाराष्ट्र शासन) व प्रमुख उपस्थिती धनंजय वाव्हळ, सलमान तांबोळी, प्रशांत गरुड, संजय गंगावणे, प्रिया तुळजापूरकर व तसेच “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!” या मराठी मालिकेतील कलाकार, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, तालुका सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

सदरील कार्यक्रम रविवार दि.२१आगस्ट रोजी सकाळी११:०० वाजता पवार लॉन्स, मीनाताई ठाकरे स्टेडियम जवळ, हिरावाडी पंचवटी नाशिक येथे पार पडला. या कार्यक्रमात सामाजिक व पत्रकारांच्या अनेक विषयावर विचार विनिमय करण्यात येऊन अनेक ठराव संमत करण्यात आले. या कार्यक्रमात नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार शंकर सिंह ठाकुर यांच्यावर नांदेड जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली तर नांदेड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष म्हणून मारोती शिकारे यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी व नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी या दोघांना विराजमान करून त्यांना निवडीचे पत्र मा. श्री विजयजी सूर्यवंशी (संस्थापक अध्यक्ष), मा. श्री सचिन पाटील (पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यापूर्वीही शंकर सिंह ठाकुर व मारोती शिकारे यांनी पत्रकार संघात व पत्रकारितेत अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या असून त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यांच्या या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार मित्र मंडळ व जिल्हाभरातून कौतुकांचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *