जिल्ह्यात ३१ ऑगस्ट रोजी दारु दुकाने बंद

नांदेड प्रतिनिधी, दि. २७ :- जिल्ह्यात बुधवार ३१ ऑगस्ट २०२२ रोजी श्री गणेश चतुर्थी हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे ९ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात श्री गणेश विसर्जन मिरवणूका होवून विसर्जनाचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सव कालावधीत सार्वजनिक  शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बुधवार ३१ ऑगस्ट २०२२ रोजी नांदेड जिल्ह्यातील दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ (१ ) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी बुधवार ३१ ऑगस्ट २०२२ रोजी श्री गणेश स्थापने निमित्त जिल्ह्यातील सर्व एफएल-२, एफएल-३, सीएल-३, सिएलएफएलटीओडी-३ व एफएल/बिआर-२ व टिडी-१ अनुज्ञप्तीधारकांना अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *