देगलूर प्रतिनिधी दि :- ०४ :- येथील श्रध्देने पुजीला जाणारा पारंपारिक असा बालाजी झेंडा दरवर्षीप्रमाणे येथील लाईन गल्लीत स्थापीत केला गेला आहे.
□पूर्वापार चालत आलेला अनेक वर्षापासून श्रध्देने भाविकांकडून पुजीला जाणारा बालाजी चा झेंडा दर ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर
सार्वजनीक भक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा याकरिता
लाईन गल्ली येथे नियोजीत झेंडाओटा स्थळी स्थापीत करण्यात येतो.
यावेळीही तो स्थापीत केला गेला लाईन गल्लीतील मानाच्या भक्ताकडून भव्य स्वागत केले गेले.हा झेंडा मिरवणुकी द्वारे आणण्यात आला.
गेल्या अनेक वर्षाची परंपरा लाभलेला बालाजी झेंडा दरवर्षी ऋषीपंचमीला लाईन गल्ली येथे आणला जातो. पण कोरोना काळातील बंधनामुळे ही परंपरा खंडीत झाली होती
आता ही परंपरा परत मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आली असून बालाजी झेंड्यांचा लाईन गल्लीतील पवित्र ओट्यावर अकरा दिवस मुक्काम रहाणार आहे. दिनांक १ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर पर्यंत झेंडा दर्शन व पुजेसाठी भक्तांसाठी उपलब्ध राहणार आहे. या कालावधीत दि. 0९। 0९ ।२२ रोजी गंगाळ प्रसाद तसेच भजन ,विष्णुसहस्रनाम पाठ कार्यक्रम होणार आहेत .
दिनांक १०/९/ २२ शनिवार रोजी महाप्रसाद भंडारा दुपारी १-०० वा. होईल. दि ११.९.२०२२ रविवारी सकाळी ११-०० वाजता लाईन गल्ली येथून झेंड्याचे प्रस्थान होऊन होट्टल बेस हनुमान मंदिर ते महाराष्ट्र तेलंगाना सीमा ते मिर्जापुर व,मदनुर येथे मुक्कामास झेंडा नेण्यात येणार अशी माहीती वंश परंपरागत सेवेकरी (पुजारी) हेमंत श्रीनिवासराव संगवई यांनी दिली आहे.