देगलूर प्रतिनिधी दि :- ०४ सप्टेबर २०२२:- दृष्टी नसणाऱ्याना सृष्टी दाखवणाऱ्या मानव्य विकास अंध विद्यालय देगलुर येथील अंध विद्यार्थ्यां सोबत त्यांना खाऊ व फळे वाटप करून संभाजी ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष मनोजजी आखरे यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील सोमुरकर, ,संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष राहुल थडके, जिल्हा संघटक बालाजी जाधव,जिल्हा अध्यक्ष नारायणराव वड्जे , देगलुर-बिलोली विधानसभा अध्यक्ष ॲड.अंकुशराजे जाधव,संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष जेजेराव पाटील शिंदे .
मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष गजानन जाधव, संभाजी ब्रिगेड शहर उपाध्यक्ष डॉ.सुनील जाधव,मुखेड तालुका उपाध्यक्ष बालाजी औराळकर, तालुका उपाध्यक्ष जगदीश जाधव, शिवकुमार फुलारी ता.संघटक,संजय निवळे कोषाध्यक्ष, निखील ठाणेकर,शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर,सर्व शिक्षक वृंद व स्टाफ सह ईतरांची उपस्थिती होती. यावेळी संकेत पाटील , राहुल , थड्के , बालाजी जाधव , डॉ. सुनिल जाधव यांनी अंध विद्यार्थ्यना अंधत्वावर मात करून शिवराया प्रमाणे महान कार्य करण्याबद्द्ल प्रेरणा दिली .या वेळी संभाजी ब्रिगेड द्वारा पुस्तक देऊन सर्व स्टाफ चा सत्कार करण्यात आला . जेजेराव शिंदे यांनी सूत्र संचलन केले तर प्रास्ताविक अंकुश राजे जाधव यांनी केले तर आभार शिवकुमार फुलारी यांनी केले .