बीड, दि. ०५:- राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेसाठी बीड जिल्हृयातील 3 महसूली विभागातुन पात्र गोशाळांचे माजलगांव, अंबाजोगाई आणि पाटोदा या तीन महसूली विभागातुन अर्ज मागविण्यात आले असून योजनेचा उद्देश, लाभार्थी गोशाळा निवडीच्या अटी व शर्ती लाभार्थी निवडीची प्रक्रिया तसेच योजनेचा विहित नमून्यातील अर्ज आणि अनुषंगिक कागदपत्रे www.ahd.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक पात्र गोशाळांनी दि. ७ मार्च ते ६ एप्रिल २०२२ या कालावधीत संबधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (व) पंचायत समिती यांच्याकडे ४ प्रतिमध्ये सादर करण्याचे, आवाहन जिल्हा पशुसंवर्धनचे उपायुक्त डॉ. एच. पी. बोयाळे बीड यांनी केले आहे.
उपायुक्त पशुसंवर्धन कार्यालयात किंवा थेट पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात किंवा ई मेलवर सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. विहित कालावधी नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तरी विहित कालावधीमध्ये पात्र इच्छुक गोशाळांनी विहित नमून्यात अर्ज सादर करावेत.