नांदेड प्रतिनिधी, दि. १० :- महामहीम महाराणी एलीझाबेथ द्वितीय, युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटेन आणि उत्तर आर्यलँड यांचे दिनांक ८ सप्टेंबर २०२२ रोजी दु:खद निधन झाले आहे.
दिवंगत मान्यवरांना आदरांजली वाहन्याचा निर्णय भारत सरकारने घेतला असून दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी संपूर्ण देशात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. रविवार ११ सप्टेंबर २०२२ रोजी ज्या इमारतीवर दररोज नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविण्यात यावा.
या दिवशी कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी बिनतारी संदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना कळविले आहे.