देगलूर प्रतिनिधी,०२ :- नुकताच प्रसिद्ध झालेला मराठी चित्रपट राडा मधील मुख्य अभिनेता आकाश शेट्टी , अजय राठोड लाच्चू देशमुख, निर्देशक रितेश नरवाडे ,सहयोगी निर्देशक रोहन पंडित ,सहकलाकार सतीश कासेवार यांनी देगलूर महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनिनी हिरो सोबत सेल्फी काढण्यासाठी प्रचंड गर्दी केली.व नवोदीत कलाकारांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
याप्रसंगी सिनेकलाकरांचे अड्त व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य जनार्दन चिद्रावार , रवींद्र अप्पा द्याडे., देवेंन्द्र मोतेवार,प्राचार्य डॉ. मोहन खताळ , ऊपप्राचार्य डॉ,अनिल चिद्रावार , पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील यांनी सत्कार केला.