शिपाई पदासाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

 

नांदेड प्रतिनिधी, दि. ०७:- सहाय्यक संचालक, नगररचना कार्यालयात वर्ग-४ शिपाई या रिक्त पदाचे कामकाज बाह्य यंत्रणेद्वारे मान्यता प्राप्त संस्था / कंपनी यांच्या कडून कंत्राटी तत्वावर उमेदवारांची सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी मान्यता आहे.

 

 

 मान्यताप्राप्त संस्था / कंपनीकडून या कार्यालयास एक (१), वर्ग-४ शिपाई पदासाठी (किमान ४ थी पास असणे आवश्यक आहे. ) उमेदवारांची सेवा निव्वळ तात्पुरत्या कंत्राटी स्वरुपात ११ महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध करुन घेण्यासाठी दरपत्रक मागविण्यात येत आहेत.

दरपत्रके सिलबंद पाकीटात बातमी प्रसिध्दी झाल्यापासून दहा दिवसाच्या आत कार्यालयीन वेळेत कार्यालयाकडे पोहचतील याबेताने पाठवावेत. प्राप्त दरपत्रके दुसऱ्याच दिवशी सकाळी ११:३० वा. उघडण्यात येईल. अटी व शर्ती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेल्या आहेत. संबंधितानी सहायक संचालक, नगररचना, नांदेड शाखा कार्यालय, नांदेड श्री. घोडजकर इमारत, दुसरा मजला, महाराणा प्रताप चौक, गांधी नगर, हिंगोली नाका नांदेड -४३१६०५ या पत्त्यावर संपर्क साधावा.

असे आवाहन नगर रचना विभागाचे सहायक संचालक प. ला. आलूरकर यांनी केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *