देगलूर प्रतिनिधी,दि. १९ :- देगलूर शहरातील मुख्य रस्त्यावर महाराष्ट्र आरटीओ ते चंद्रभागा पेट्रोल पंप व मदनूर नाकातील देगलूर महाविद्यालय या रस्त्याच्या दुतर्फा साचलेल्या वाळूचा व मातीच्या बारीक कणांचा सर्वांना त्रास होत आहे विशेष करून हा त्रास पादचारी व दुचाकीस्वारांना जास्त होत आहे.
एखादे मोठे वाहन बाजुने जात असताना वाळू व धुळीचे कण डोळ्यात उडतात, चेहऱ्यावर उडतात, डोळ्याला इजा होते व त्यामुळे वाहन चालकांचा सायकल स्वरांचा तोल सुद्धा जातो तोल जाऊन ते जखमी देखील होतात पण ही बाब देगलूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यास का दृष्टीस पडत नाही असा सवाल देखील उपस्थित होतो. याकडे तात्काळ लक्ष देऊन साफसफाई करण्याची गरज असल्याचे नागरिकात बोलले जात आहे.