नांदेड विद्यापीठ अभ्यास मंडळात देगलूर महाविद्यालयाच्या चार प्राध्यापकांची नियुक्ती

देगलूर प्रतिनिधी,दि.०९ :- स्वा रा ती म विद्यापीठाच्या विविध प्राधिकरनाच्या निवडणुका पार पड़ल्यानंतर कुलगुरु महोदयाच्या आधिकारात विविध अभ्यास मंडळात नामनिर्देशित सदस्य पदावर अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील चार प्राध्यापकांची नियुक्ती झाली आहे.


त्यात लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ.बालाजी कतुरवार व डॉ.संजय देबडे यांची लोकप्रशासन अभ्यास मंडळात काम करण्याची संधी मिळाली आहे. तर मराठी विभागातील प्रा. डॉ. सर्जेराव रणखाम्ब यांना मराठी अभ्यास मंडळात काम करन्याची संधी प्राप्त झाली आहे. तसेच प्रा डॉ रत्नाकर लक्षटे यांना राज्यशास्त्र अभ्यास मंडळात संधी मिळाली त्याबदल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष नारायणराव

 

 

 

 

मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , जनार्दन चिद्रावार ,गंगाधर जोशी, रवींद्र अप्पा द्याडे. देवेंन्द्र मोतेवार , चंद्रकांत नारलावार,प्राचार्य डॉ. मोहन खताळ ,ऊपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, उपप्राचार्य एम एम चमकुडे , पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी , यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यानी आभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *