देगलूर प्रतिनिधी,दि.०१ :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय देगलूर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.या वर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील एकात्मिक दृष्टीकोन’ आहे.
प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांनी रामन इफेक्टची घोषणा केली होती. ज्यासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. यानंतर, सी.व्ही. रामन यांनी रमन इफेक्टचा शोध लावल्याबद्दल १९८६ पासून दरवर्षी २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी बीएससी प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्गातील विद्यार्थ्यांनी भीतीपत्रके, वेगवेगळी प्रात्यक्षिके सादर केली तथा विज्ञान या विषयावरती आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अनिल चिद्रावार, डॉ.हनमंत लाकडे हे होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.मोहन खताळ यांनी विज्ञानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीएससी तृतीय वर्षाचे विद्यार्थिनी कु.वैष्णवी शिवपुजे, विद्यार्थी सुधाकर चेंडके यांनी केले तर आभार कु.निकिता खपाटे या विद्यार्थिनीने मानले.