देगलूर महाविद्यालयास NAAC पुनर्मूल्यांकनात B++ दर्जा प्रदान

 

 

 

देगलूर प्रतिनिधी,दि.०१ :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचालित देगलूर महाविद्यालयाचे राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेच्या समितीद्वारे (NAAC) मुल्यांकन करण्यात आले. महाविद्यालयाने केलेल्या अध्ययन, अध्यापन व संशोधन क्षेत्रात केलेली प्रगती तसेच विद्यार्थ्यांची वाढती गुणवत्ता ,क्रीडा, समाजसेवा , नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम , निसर्गरम्य हरित परिसर व दर्जेदार भौतिक सुविधा पाहून समितीने महाविद्यालयाच्या तीस-या पुनर्मूल्यांकनात B++ चा दर्जा प्रदान केला आहे.


महाराष्ट्र , कर्नाटक व तेलंगाना या तीन राज्याच्या सीमावर्ती भागातील मुलामुलींना दर्जेदार उच्च शिक्षण देणारे ग्रामीण महाविद्यालय आपली गुणवत्ता क़ायम ठेवली आहे.

 

 

 

 

 

 

 

विद्यार्थ्याच्या गुणवता वाढीबरोबर त्याच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले जात आहे. महाविद्यालयातील सर्व विभाग व परिसर अद्ययावत करण्यासाठी अड्त व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव श्री शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष श्री नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार ,जनार्दन चिद्रावार ,गंगाधर जोशी, रवींद्र अप्पा द्याडे.

 

 

 

 

देवेंन्द्र मोतेवार चंद्रकांत नारलावार प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक, कर्मचारी ,आजी व माजी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. प्रस्तुत कामासाठी उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार आयक्यूएसी समन्वयक डॉ. लक्ष्मण सुदाम, सहसमन्वयक डॉ. विनय भोगले , ऊपप्राचार्य श्री एम एम पटेल , पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी , मनोज साखरे यांच्या सह वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतल्याची माहिती डॉ. मोहन खताळ यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *