जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या विशेष बाल पोलीस पथक अधिकारी यांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

 

 

हिंगोली, दि.०१ :-  येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन येथील विशेष बाल पोलीस पथक अधिकारी यांची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे यांनी केले. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुधाकर तानाजी इंगोले यांनी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत बाल कल्याण समिती रचना व कार्यप्रणाली विषयी सविस्तर माहिती दिली.

 

 

 

 

 

 

 

 

 

बाल कल्याण समिती सदस्य परसराम हेंबाडे यांनी काळजी व संरक्षणाची गरज असलेला बालक पोलिसांमार्फत बाल कल्याण समिती समोर सादर केला जातो त्यावेळेस कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

 

 

 

तसेच १७ नंबरचा फार्म कसा भरावा याविषयी माहिती दिली, समिती सदस्या संगिता दुबे यांनी बाल विवाह प्रतिबंध कायदा २००६ विषयी माहिती दिली. समिती सदस्या बाली भोसले यांनी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ विषयी सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षण झाल्यानंतर येणाऱ्या अडचणी विषयी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली.

 

 

 

 

या प्रशिक्षणामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाबाबत सविस्तर माहिती दिली. कायदा तथा परिविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित यांनी प्रशिक्षणाचे सुत्र संचालन केले. समुपदेशक सचिन पठाडे व सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यानी प्रशिक्षणात सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *