किनवट महावितरन मध्ये वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे कर्मचारयाचा जीव धोक्यात ?

 किनवट महावितरणचे कर्मचारी करतात जीवावर उदार होऊन       काम

किनवट प्रतिनिधी, सी.एस. कागणे दि.१८: सध्या पावसाळा असलयामुळेजिकडे तिकडे चोहीकडे पाणीच पाणी गडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात वारं वादळ या मुळे सहाजिकच विजेची समस्या होणार पण आपल्याला विजेमुळे गैरसोय होऊ नये म्हणून महावितरणचे कर्मचारी हे या सर्वावर मात करत आपल्या जिवाची पर्वा न करता लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहतात आणि ते न रात्री,न दिवस,न ऊन, न वारा सदैव आपल्या कामाला हजर राहुन आपल्याला सेवा देतात पन किनवट मध्ये याच कर्मचारयाची आपल्याच वरिष्टाकडुन गळचेपी होत आहे असे दिसून येते.

त्याचेच एक उदाहरण म्हणून किनवट गोकुंदा रोडवर असलेली ही रोहित्रि डीपी ही सतत पाण्याखाली असते या बाबतीत वारंवार वरिष्ठ अधिकारी यांना कर्मचाऱ्यांनी तोंडी सुचना दिल्या पन वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत असे चित्र दिसत आहे. डीपीचा फेज जर गेला तर कर्मचाऱ्यांना फेस टाकण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे यात जिवाचा देखिल धोका आहे येवढा मोठ्ठा धोका असुन देखील ही बाब वरिष्टाच्या लक्षात कशी येत नाही देव जाणे पन ही कसरत करता करता काही अनर्थ होण्या आधी याकडे लक्ष देईल का अशी चर्चा कर्मचारी व नागरीकात होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *