देगलूर प्रतिनिधी,दि.१० :- जगाला शांतीचे संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त ५ मे रोजी देगलूर येथे धम्मज्योत रॅली शहराच्या मुख्य मार्गाने काढण्यात आली. या रॅली मध्ये बुद्धाच्या प्रतिमा ठेवून सर्व उपासकांच्या हातात मेणबत्ती लावली बुद्ध संरणंग गच्छामी ,धम्म संरणंग गच्छामी, संघ संरणंग गच्छामी ,
त्रिसरण पंचशील ग्रहण करत नागार्जुन बुद्ध विहार येथून ही रॅली गौतम नगर ते होट्टल बेस ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते महात्मा बसवेश्वर पुतळा ते हनुमान मंदिर ते भवानी चौक ते नागार्जुन बुद्ध विहार या शहराच्या मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली.
दिनांक ७ मे रोजी बुद्ध जयंती निमित्त धम्मदेशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूज्य भंते नागवंश विपश्यना चार्य बालाघाट मध्यप्रदेश येथील भंतेजींनी भारत देश हा बुद्धामुळे सोने की चिडिया म्हणून जगात भारताची ओळख आहे असे भंते नागवंश आपल्या धम्मदेशनेत म्हणाले. हा कार्यक्रम नागार्जुन बुद्ध विहार येथे दुपारी ठीक १२:०० वा. आयोजीत केला होता .
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन सिद्धार्थ नगर च्या वतीने करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने उपासक पांढरे वस्त्र परिधान करून उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनय कांबळे (पत्रकार) , अनिकेत कांबळे, बंटी एडके, आदीने परिश्रम घेतले..