नवी दिल्ली प्रतिनिधी,दि. २५ :- भारत भौगोलिक मानांकन उत्पाद मेळाव्यात महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकने प्राप्त हळद, डाळिंब, केळी, गुळ, हस्तशिल्प तसेच हातमाग आदी उत्पानांची दालने उभारण्यात आली होती. या दालनांना चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची भावना सहभागी संस्थांनी व्यक्त केली.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालयांच्या अधिनस्त निर्यात प्रमोशन कौन्सिल फॉर हॅन्डीक्राफ्ट्स (EPCH) द्वारे इंडिया एक्स्पो सेंटर आणि नॉलेज पार्क, ग्रेटर नोएडा येथे हस्तकलेसाठी निर्यात प्रोत्साहन परिषद GI
(भौगोलिक मानांकन) फेअर इंडिया २०२३ चे आयोजन २० ते २४ जुलै २०२३ या दरम्यान करण्यात आले होते. या मेळ्याव्यात ४६० पेक्षा जास्त भौगोलिक मानांकन उत्पादनांचे दालन उभारण्यात आले होते.
इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट, ग्रेटर नोएडा येथे या मेळ्याचे उद्घाटन २० जुलै रोजी केंद्रीय रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश यांच्या हस्ते झाले. यावेळी निर्यात प्रमोशन कौन्सिल फॉर हॅन्डीक्राफ्ट्स चे अध्यक्ष दिलीप बैद उपस्थित होते.