मितभाषी पत्रकार राजकुमार स्वामी यांचे अल्प आजाराने निधन.

 

नांदेड दि.१५ :– इंडिया न्यूज या वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी आणि मितभाषी स्वभावामुळे ओळखले जाणारे राजकुमार स्वामी (वय 50) यांचे 14 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.

 

 

गेल्या काही महिन्यांपासून रक्त तयार न होण्याच्या आजाराने ते त्रस्त होते. काल रात्री प्रकृती बिघडल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

 

जिल्ह्यातील सर्व पत्रकारांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. बुद्ध पहाट या सांस्कृतिक कार्यक्रमात ते नेहमी सक्रिय सहभागी होत असत. विशेष म्हणजे, उद्या 15 ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस होता, पण वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मृत्यूने त्यांना कवटाळले.

 

 

त्यांची अंत्ययात्रा 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता गणेश नगर, पावडेवाडी नाका रोड येथील निवासस्थानापासून निघणार असून गोवर्धनघाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.