जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात सेवा हक्क कार्यक्रम संपन्न

 

हिंगोली प्रतिनिधी, दि. २८ : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा या कालावधीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांचे वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून त्याचाच एक भाग म्हणून दि. २६ सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी १२.३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,हिंगोली येथे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष  सुनिल महिंद्रकर यांच्या अध्यक्षतेखाली सेवा हक्क कार्यक्रम पार पडला.

 

 

 

 

या कार्यक्रमासाठी सहाय्यक आुयक्त शिवानंद मिनगीरे, हिंगोली, वसमत व कळमनुरी येथील उपविभागीय कार्यालयातील प्रमुख कर्मचारी तसेच समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

यावेळी सुनिल महिंद्रकर यांनी सेवा हक्क अधिनियमाबाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *