देगलूर प्रतिनिधी, दि.१५ :- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मठ संस्थान तसेच वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेले देगलूर येथील वै धुंडा महाराज मठातील गहिनीनाथ महाराज देगलूरकर यांचे आज दि. १५ ऑक्टोंबर शनिवार रोजी पहाटे ४:३० वाजता वृद्धापकाळाने रहाते घरी निधन झाले.
मृत्यू समयी ते ८८ वर्षाचे होते.त्यांच्या पार्थिवावर समाधी घाट येथे शनिवारी दुपारी ०२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.वै. धुंडा महाराज महाविद्यालयाचे सचिव राजेश महाराज देगलूरकर व औरंगाबाद येथील संगीत प्रा. अंबरिश महाराज देगलूरकर यांचे वडील व हभप शेखर महाराज देगलूरकर, डॉक्टर शारंग महाराज देगलूरकर यांचे ते काका होते.
त्यांच्या मृत्यूने त्यांच्या गणगोतात व संपूर्ण वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.