शासकीय ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

 जिल्हा सांख्यिकी अधिकारी करेवार यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

 हिंगोली, दि. १६: भारताचे माजी राष्ट्रपती दिवगंत डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांच्या स्मृती सार्थरीतीने जतन करुन त्यांना आदरांजली अर्पण  करण्यासाठी  आणि विद्यार्थ्यामध्ये व समाजाच्या इतर घटकांना वाचनांची आवड, प्रेरणा निर्माण करणे. वाचनाचे महत्व जाणून घेणे, यासाठी दरवर्षी  डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचा (१५ऑक्टोंबर) हा जन्म्‍ा दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय हिंगोली येथे दि. १५ ते १८ ऑक्टोंबर, २०२२ या कालावधीत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 

               या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा सांख्यीकी अधिकारी अतिवीर करेवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी वाचन संस्कृतीचा प्रचार,प्रसार, विकास व वाचनाचे महत्व विषद करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जेष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष खंडेराव सरनाईक, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह संतोष ससे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, संतोष सामाले व इतर ग्रंथालय कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 

              हे ग्रंथ प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे दि. १५ ते १८ ऑक्टोंबर, २०२२ या कालावधीत सर्वांसाठी खुले असून नागरिकांनी  याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *