देगलूर प्रतिनिधी, दि.२४ :- देगलूर तालुक्यातील सर्व बेरोजगारांसाठी” देगलूर तालुका शिवसेना उद्धव गट” यांच्यातर्फे ‘रोजगार भरती’ मेळावा शिवसेना नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख मा.श्री. बबनराव थोरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नगरेश्वर मंगल कार्यालय तळगल्ली देगलूर येथे दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० आयोजित करण्यात येणार आहे.
या मेळाव्यात ८,९,१० वी पास अथवा नापास असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुरक्षा रक्षक, व पदवी धर युवकांना सुपरवायझर या पदासाठी भरती मेळावा आहे त्यामुळे तालुक्यात सध्या असलेल्या बेरोजगार बांधवांना भरपूर प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त होत आहे.
तरी सर्व सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या मेळाव्यात शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन सहभागी होऊन या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे देगलूर तालुका प्रमुख महेश पाटील यांनी केले आहे.