देगलूर प्रतिनिधी,दि.०८ :- काँग्रेस पक्षाला हवे असणारे भावी पंतप्रधान व वायनाडचे खासदार श्री राहुल गांधी हे पक्षाची घसरती स्थिती पाहता “भारत जोडो” यात्रा अभियान देशभरात राबवून देशात आपल्या पक्षाची भूमिका व धुरा सांभाळण्याच्या निष्काम प्रयत्न करीत आहेत.
त्यासाठी त्यांनी दोन महिन्यापूर्वी केरळ मधील कन्याकुमारी येथुन “नफरत छोडो””भारत जोडो” हे ब्रीदवाक्य घेऊन पायी यात्रा काढून आंध्र व तेलंगणा प्रदेश दौरा करून काल दिनांक ०७ -११ – २०२२ रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील काही पक्षातील बडे नेते व कार्यकर्त्यांनी नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संपवण्याचा डाव आखला आहे की काय असे भासत आहे.
अशी शंका आता देगलूर मधील शहरांमध्ये दक्ष व जागरूक नागरिक करीत आहेत. याचे कारण मागील देगलूर, बिलोली मतदार संघात पोटनिवडणुकीत देगलूर बिलोली येथील स्थानिक पत्रकार व मीडियाला डावलून जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी आपल्या संबंधातील व जिल्हा पातळीवरील पत्रकारावरच निवडणुकीचा भार सोपवला.व स्थानिक व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या पोटावर माती घातली.
तो विषय संपलाच नाही की दिवाळीच्या जाहिराती पण जिल्हा पातळीवरच मॅनेज होऊ लागल्या आहेत. यावेळी दिवाळीच्या जाहिराती सुद्धा स्थानिक व ग्रामीण भागातील पत्रकारांना कुठल्याही स्थानिक च्या नेत्याकडून मिळालेल्या नाहीत. अशी देखील चर्चा झाली आहे. यावरून हे सिद्ध होत आहे.
यातच भर म्हणून की काय काल तर चक्क हद्दच झाली राहुल गांधीच्या “भारत जोडो”यात्रेदरम्यान राहुल गांधीचा कार्यक्रमाला काही कारणाने विलंब होत होता.दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ होत असल्यामुळे एका महाशयाने स्टेजवरून पत्रकारांना जेवणाचे निमंत्रण दिले.त्यामुळे काही स्थानिकचे व सर्कलचे पत्रकार देखील जेवणाच्या ठिकाणी पोहोचले.
पत्रकार हा जेवण्यासाठी कधीही लाचार नसतो पण आपण दिलेल्या आमंत्रनाचा सन्मान म्हणून जेवणाच्या ठिकाणी पोहोचले असता तिथे त्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते असावे. धिक्कार तुमच्या वृत्तीला.
एरवी छोट्या मोठ्या कार्यक्रमात देखील स्थानिक पत्रकारांना विशेष सन्मान दिला जातो.
Wanted reporter’s in your area if anyone interested please contact 9030512904.
तर एवढ्या मोठ्या कार्यक्रमातून स्थानिकच्या पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिली गेल्याने येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेसला याचा मोठा फटका सहन करावा लागणार असल्याची चर्चा आता गल्लीबोळात होत आहे.
जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी जिल्ह्यातील लोकांना सांभाळले परंतु स्थानिक पुढाऱ्यांनी लाचारी दाखवली. म्हणून यापुढे जशी वागणूक आम्हाला मिळेल तसेच उत्तर तुम्हालाही मिळेल असे स्थानिक पातळीवर पत्रकारांनी ठरवल्याची चर्चा आहे.