मंत्र्याचा मोबाईल लंपास करून पोलिसांपुढे आव्हान!
देगलूर प्रतिनिधी, ता. १२:- गांधी घराण्यातली त्यातल्या त्यात राहुल गांधीची पहिली पदयात्रा म्हणून या यात्रेला नागरिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद देगलूर मध्ये पाहण्यास मिळाला ते कसे दिसतात, कसे बोलतात, कसे चालतात, याबद्दल सर्वांनाच कुतूहल निर्माण झाले होते.
व त्याची महाराष्ट्रातील सुरुवात देगलूर मधून होत असल्यामुळे या यात्रेस राजकीय पक्षातील वरिष्ठ देखील सामील झाले होते. गावागावातून लोक देगलूर मध्ये आले होते पण यांच्यामध्ये काही संधी साधू देखील असतील याचा विचारही कोणी केलेला नव्हता.
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काही परगावातील चोरट्यांनीही डाव साधला. व राहुल गांधीला पाहण्याच्या व ऐकण्याच्या इच्छेने आलेल्या नागरिकांच्या खिशावर हात साफ केला त्यात काही जणांचे मोबाईल, पाकिट त्याचबरोबर सोन्याची साखळ्याही चोरल्याचे पुढे आले आहे.भारत जोडो यात्रानिमित्ताने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील येथील कार्यकर्त्यांनी यात्रेसाठी गेल्या महिन्याभरापासून मोठी जय्यत तयारी केली होती. एकीकडे भारत जोडो यात्रेचे उत्साहात स्वागत होत असताना झालेल्या गर्दीचा माजी मुख्यमंत्र्यांचाही मोबाईल लंपास मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्री दिग्विजयसिंह यांचाही मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याचे देखील वृत्त आता पुढे येत आहे.
सोमवारी संध्याकाळी बजरंग देशमुख बळेगावकर यांची १५ ग्रॅम सोन्याची साखळी, चंद्रकांत पंदिलवार यांची १३ ग्रॅम, गोपाळ पाटील सुगावकर यांची १३ ग्रॅम,सागर चिंतावार यांची १२ ग्रॅम व राहुल सोमशंकर यांची १७ ग्रॅम सोन्याची साखळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा उठवत लंपास केली. याव्यतिरिक्त शेकडो लोकांचे पर्स नगदी पैसे या चोरट्याने लंपास केले असल्याची चर्चा देखील आता देगलूरच्या गल्लीबोळात होत आहे.
त्यामुळे आधीच काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार असे गणित लागल्यामुळे राहुल गांधीच्या यात्रेतून देखील चोरट्यांनी जमलेल्या नागरिकांचे खिसे कापत यात भर टाकली आहे अशी चर्चा आता रंगू लागली आहे. तर दुसरीकडे मंत्र्याचा मोबाईल व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचे मोबाईल सोन्याचे चैन व पैसे गेल्यामुळे पोलिसांच्या कामात भर झालेली दिसत आहे.