पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ०५ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र
देगलूर प्रतिनिधी,दि.१२:- नुकताच पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत येथील परम पूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ०५ विद्यार्थ्यांनी यश संपादन करुन शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
त्यामध्ये सुघोष बालाजी काब्दे २६८, दर्शिल जयकुमार बोंत्तापल्ले १६२, कृष्णा राम भागवत १६०,वैष्णवी इंद्रजीत बिरादार १५६,
श्लोक दत्तात्रय मिरलवार १४२ या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सदरील परीक्षेस १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह डॉ हेमंत वैद्य, संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा चंद्रकांतराव मुळे तसेच स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मा चंद्रकांतजी रेखावार, कार्यवाह मा. प्रकाशजी चिंतावार शालेय समिती अध्यक्ष मा संजयजी पाटील, मुख्याध्यापक बाळासाहेब केंद्रे गुरुजी, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.