डॉ.एम.एम.भागवत (राचकोंडा कमिशनर) यांची प्रमुख उपस्थितीत
हैदराबाद प्रतिनिधी, दि.१२:-मराठा भवन जलपल्ली येथे दि. २० नोव्हेंबर २०२२ रविवार या दिवशी सकाळी १०:३० वाजता तेलंगणा मराठा मंडळ च्या सानिध्यात “दसरा दिवाळी” संमेलन आयोजित करण्यात येत आहे.
तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त मराठा समाज व मराठी बांधव उपस्थित राहुन कार्यक्रमा ची शोभा वाढवावी. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.एम.एम.भागवत (राचकोंडा कमिशनर), सुरेंद्र कुमार चंद्रकांतराव मानकोसकर (IRS. मेडचल जीएसटी कमिशनर). यांची गरिमामय उपस्तिथी राहणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे तसेच,गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार, खेळपटु . आणि थोर समाज सेवक यांचे सत्कार या वेळी केले जा़णार आहेत.
मराठा समाजा तर्फे येथे स्नेहभोजनाची पण व्यवस्था आहे. हैदराबाद परिसरातील सकल मराठा बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहावे.
असे आवाहन “तेलंगाना मराठा मंडळ” “श्री छत्रपती शिवाजी मराठा नवयुवक मंडळ” “श्री छत्रपती शिवाजी मराठा सांस्कृतिक ट्रस्ट” “तेलंगाना मराठा भगिनी मंडळ” “तेलंगाना गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी असोसिएशन” “तेलंगाना वारकरी भजन मंडळ” “लक्ष्मी कांत शिंदे,सेक्रेटरी तेलंगाना मराठा मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.