हिंगोली, दि. १२ : सुहाना काशिम शेख वय ०७ वर्ष ही बालिका बुलढाणा येथे सापडली असून या बालिकेने नांदेडचा पत्ता सांगितला त्यामुळे मा.बाल कल्याण समिती, नांदेड यांच्या दाखल आदेशान्वये सुमन मुलींचे बालगृह राम नगर नांदेड येथील बालगृहात प्रवेश दिला.
या बालगृहात दि.२५ नोव्हेंबर, २०२० ते २३ मार्च, २०२१ वास्तव्यास होती. दि.२४ मार्च, २०२१ रोजी मा.बाल कल्याण समिती, लातूर यांच्या बदली आदेशाने शासकीय मुलींचे बालगृह मुरुड ता.जि.लातूर येथे आजपर्यंत प्रवेशित आहे. या संस्थेत पुढील संगोपन व पुर्नवसनासाठी दाखल करण्यात आले आहे. ही बालिका सडपातळ बांध्याची गोऱ्या वर्णाची मध्यम उंचीची आहे.
ही बालिका लातूर येथील बालगृहात प्रवेशित असून बालिका हिंगोली जिल्ह्याची रहिवाशी असल्याचे सांगत आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील या बालिकेचे जवळचे कोणी नातेवाईक किंवा आई-वडील असल्यास पुराव्यासह तीस दिवसाच्या आत श्री. सुधाकर तान्हाजी इंगोले (मो. ९४०९५०४५९४ ), अध्यक्ष, मा.बाल कल्याण समिती, सरस्वती मुलींचे निरिक्षणगृह/बालगृह, सावरकर नगर, ता.जि.हिंगोली आणि श्री. व्ही.जी.शिंदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हिंगोली (मो. ९८३४८९९४५० ), श्रीमती सरस्वती कोरडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, हिंगोली (मो. ७०८३३८९८९९ ), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, एस.७, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, ØÆüÝÖÖê»Öß-४३१५१३ या पत्त्यावर मुदतीच्या आत संपर्क साधावा.
मुदतीच्या आत संपर्क न साधल्यास या बालिकेचे कोणीही नातेवाईक व आई-वडील हयात नाहीत अथवा ते या बालिकेची जबाबदारी घेण्यास तयार नाहीत, असे गृहीत धरुन दत्तकाची व पुनर्वसनाची कार्यवाही पुर्ण केली जाईल व त्यानंतर कोणाचीही कसलीही तक्रार व आक्षेप राहणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.