देगलूर ( प्रतिनिधी)-दि.१८.नोव्हेबर रोजी जि.प.के.प्रा.शाळा शहाजीनगर देगलूर आयोजित करण्यात आलेले बीट स्तरावरील भाषण स्पर्धा, विषय मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनातील नांदेड जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान यामध्ये लहान गटातून इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कु. जिज्ञासा सोपान बोडके व मोठ्या गटातून इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कु. वैष्णवी देवकत्ते या दोन विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळवलेला आहे.
तालुकास्तरावर निवड झालेल्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगांवकर, स्थानिक अध्यक्ष चंद्रकांतजी रेखावार,कार्यवाह प्रकाशजी चिंतावार, शालेय समिती अध्यक्ष शिल्पाताई अटकळीकर व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.