देगलूर प्रतिनिधी, दि.१९ :- पत्रकार बंधूंच्या उपोषणास देगलुर संभाजी ब्रिगेड चा पाठिंबा दिनांक १८-११-२०२२ रोजी लोकशाहीचा महत्त्वाचा आधार स्तंभ पत्रकार यांना तहसील कार्यालय देगलुर येथील कर्मचारी यांनी उद्धटपणे वागणुक दिली त्यामुळे उपोषणास बसलेल्या पत्रकार सतीश पाटील क्यादरे , संपादक गजानन बिड्कर यांना संभाजी ब्रिगेड देगलुर च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यत आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक बालाजी पाटील जाधव , देगलुर बिलोली विधान सभा अध्यक्ष अँड. अंकुश राजे जाधव , सचिव देविदास थड्के देगावकर , उप शहर अध्यक्ष डॉ. सुनील जाधव , मुखेड तालुका उपाध्यक्ष न्यानेश्वर पाटील बोड्के , उमेश मुण्ड्कर , सतीश दमकोंडवार आदींनी सहायक जिल्हा अधिकारी देगलुर , तहसिलदार देगलुर यांना पाठिंबा दिल्याचे निवेदन देऊन लोक शाहीचा महत्त्वाचा आधार स्तंभ पत्रकार यांना न्याय द्यावा असे निवेदन दिले.