देगलूर/प्रतिनिधी दि.१९:- देगलूर तालुक्यातील शहापूर येथे पत्रकार वसीम शहापुरकर मित्र मंडळच्या व येथील सार्वजनिक हजरत शहीद टिपू सुलतान रहे समितीच्या वतीने दिनांक २० -११- २०२२ रोजी ठीक सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत रक्तदान व अन्नदान कार्यक्रम नियोजित केले आहे टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्ताने दरवर्षी ववेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते.
त्या कार्यक्रमात सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे लोकांचे जीव वाचू शकतात जगात सर्व प्रकारच्या कारखाने आहे आणि सर्व प्रकारच्या वस्तू त्या कारखान्यात बनवल्या जातात पण ब्लड अशी वस्तू आहे की ज्याचा नाही एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीला दिले जाते म्हणूनच रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान जगाने मान्य केले आहे व सोबतच अन्नदान देखील करण्यात येणार आहे आणि टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला फुल व पुच्छगुच्छ अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे .
जे कोणी अभिवादन करायचे असेल तर त्यांना या माध्यमातून करण्यासाठी सर्व टिपू सुलतान समिती तर्फे असे आवाहन केल्या जाते की जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करून दुसऱ्याचे जीवन वाचवावे महारक्तदान शिबीर मध्ये भाग घ्यावा असे आवाहन शहापूर व आजू बाजूचे ग्रामीण लोकांना आवाहन करण्यात येते.