तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पाळोदीच्या विद्यार्थ्यांना दिली तंबाखूच्या दुष्परिणामाची माहिती

वाशिम दि.२४ :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिमच्या चमूने मानोरा तालुक्यातील पाळोदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत आयोजीत कार्यक्रमात तंबाखूच्या दुष्परिणामाची माहिती दिली.
     जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथील तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ.ए.एम.पांढारकर यांनी तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणारा मुखाचा कर्करोग,मुख कर्करोगाची प्राथमिक लक्षणे,तंबाखूमुक्त शाळा व निकष याबाबत शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
     मानसशास्त्रज्ञ राम सरकटे यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने शरीरावर होणारे दुष्परिणाम, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध नियंत्रण अधिनियम(कोटपा २००३ ) तसेच तंबाखू/ गुटखा/ बिडी /सिगारेट सोडण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००११२३५६ याबाबत शालेय विद्यार्थ्यांना माहिती दिली.
         सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी शालेय विद्यार्थी व शिक्षकांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.जी.सातपुते,शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाशिम जिल्ह्यात प्रतिनिधी नेमणे आहेत संपर्क 9890476595 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *