धर्माबाद येथे १७ तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई

 

नांदेड प्रतिनिधी,  दि. ०३ :-  धर्माबाद शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३  कायद्याचे उल्लंघन होत असल्याची  माहिती मिळताच जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने धर्माबाद शहरात अचानक धाड टाकून १७ तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली. या कार्यवाहीत तंबाखू विक्रेत्यांना १८ हजार ३०० रुपयाचा दंड आकारला.

 

 

 

ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे,  कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड तसेच ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथील वैद्यकीय अधीक्षक वेणुगोपाल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन आडे तसेच स्थानिक पोलीस  निरीक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.जयराम चुकेवाड व पी.सी. एस.आर.घोसले आदी होते.

 

 

 

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *