परभणी, दि. ०३: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राज्यात २६ नोव्हें ते ०६ डिसें २०२२ हा कालावधी समता पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून उद्या शनिवारी (दि.०३) सकाळी साडेअकरा वाजता ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संघटना राणी सावरगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा जास्तीत – जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले.
समता पर्व कालावधीत संविधानाबाबत जनजागृती करणे तसेच सामाजिक न्याय विभागाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.