देगलूर महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबीर संपन्न.

देगलूर प्रतिनिधी,दि.०४ :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयात समता पर्व निमित्ताने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड मार्फत इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे मंडणगड पॅटर्न प्रमाणे जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर घेण्यात आले.

 

 

 

शासन आपल्या दारी या योजने प्रमाणे विद्यार्थ्याना अत्यावश्यक असलेले जात प्रमाणपत्र सहज व सुलभरीत्या उपलब्ध व्हावे या उद्देशाने प्रस्तुत अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

 

 

या एक दिवसीय जात वैधता प्रमाणपत्र वाटप व मार्गदर्शन शिबिरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन खताळ व पोलिस निरीक्षक सुनीता शिंदे व बालाजी शिरगीरे यांनी मार्गदर्शन केले.

 

 

 

या शिबिरात १८ विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी पर्यवेक्षक संग्राम पाटील डॉ संजय पाटील, नोडल अधिकारी डॉ धनराज लझडे व श्री दत्तप्रसन्न साखरे उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *