देगलूर प्रतिनिधी, दि.०५:- देगलूर महाविद्यालयतील चार खेळाडूंचे २४ वी महाराष्ट्र राज्य आयोजित क्रीडा महोत्सव आंतर विद्यापीठीय स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद,येथे होणाऱ्या २४ वी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठीय क्रीडा महोत्सव स्पर्धेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड च्या संघात देगलूर महाविद्यालय, देगलूर चे चार खेळाडू कू.सम्रता
इबीतवार,कु.सपना अल्लापूरकर हे व्हॉलीबॉल मध्ये तर श्री हेमनार अनिल ४०० मी व श्री.घंटेवाड मारोती १०० मी धावणे स्पर्धेत विद्यापिठातून सर्वप्रथम येत अंतर विद्यापीठीय क्रीडा महोत्सवात यांची निवड झाली आहे.या खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून डॉ.निरजकुमार उपलंचवार व प्रा. हाके सिताराम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या खेळाडूंचे अभिनदंन अड्त व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश पाटील बेंबरेकर, संस्थेचे सचिव श्री शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष श्री नारायणराव मैलागीरे, सहसचिव श्री सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष श्री विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य श्री राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , श्री देवेंन्द्र
मोतेवार ,श्री गंगाधर जोशी, श्री जनार्दन चिद्रावार, श्री रवींद्र अप्पा द्याडे. श्री चंद्रकांत नारलावार,प्राचार्य डॉ. मोहन खताळ,उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य श्री चमकुडे एम.एम.,प्रसिद्धि प्रमुख डॉ. बी. आर .कत्तुरवार,पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी यांनी आभिनंदन केले आहे.