नांदेड प्रतिनिघी दि :- ०८ :- पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र पोलीस नेमबाजी स्पर्धेत नांदेड पोलीस दलातील क्युआरटी पथक येथे नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी विट्ठल घोगरे, पोकॉ / शंकर भारती, ज्ञानोबा चौंडे, केशव अंमलदार शंकर भारती यांनी १५ मीटर पिस्टल कॉटींग पोजिशन या नेमबाजी प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले व पोलीस अंमलदार ज्ञानोबा चौंडे यांनी पिस्टल स्नॅप फायर या नेमबाजी प्रकारात कास्य पदक
अवचार, हनमंत पाखलवार हे नांदेड पोलीस दलाचे वतीने सहभागी झाले होते. सदर स्पर्धे मध्ये पोलीस प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र पोलीस क्रिडा स्पर्धा २९ नोव्हेंम्बर ते २ डिसेंबर २०२२ रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रं. १ पुणे येथे पार पडल्या स्पर्धेमध्ये पदक प्राप्त केलेले स्पर्धकास राज्य राखीव पोलीस बल गट क्रं.. १ चे समादेशक प्रविण कुमार पाटील, नानविज पोलीस प्रशिक्षण केंद्र येथील प्राचार्य रामचंद्र केंडे यांच्या उपस्थितीत पदके प्रदान करण्यात आली.

महाराष्ट्र पोलीस नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करणारे नांदेड जिल्हा पोलीस दलातील क्युआरटी पथकात कार्यरत पोलीस अंमलदार शंकर भारती यांची निवड अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेसाठी करण्यात आली असुन सदरची नेमबाजी स्पर्धा तामिळनाडु राज्यात होणार आहे.
नांदेड पोलीस खेळाडुंच्या उत्कृष्ट कामगीरीसाठी मा. श्री निसार तांबोळी, पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड, मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा. डॉ. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, मा. डॉ. श्रीमती अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु.) नांदेड यांनी सदर पोलीस अंमलदार यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
